Breaking News

सुधागडातील प्रसाद भिलारेची फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत निवड

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील खेळाडू आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत असून कळंबोशी गावचा सुपुत्र प्रसाद देविदास भिलारे याची इंडोनेशिया नेपाळ आशियाई फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत 19 वयोगटात नुकतीच निवड करण्यात आली आहे.

   सध्या प्रसाद हा मिठागर फुटबॉल क्लब मुंबई या संघाकडून खेळतो आहे. फुटबॉलबरोबरच कराटेमध्येदेखील प्रसादने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले आहे. त्याच्या या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply