Breaking News

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपींवर गुन्हा

माणगाव ः प्रतिनिधी – महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना माणगाव तालुक्यातील शिरवली गावात 27 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने आपला पती व नातेवाईक यांच्या समवेत विचारविनिमय केल्यानंतर 30 एप्रिल रोजी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

27 एप्रिल रोजी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पीडित महिलेच्या शेजारी राहणारी आरोपी महिला फुलाबाई मारुती डोईफोडे (45) यांनी फिर्यादी पीडित महिलेला खोटे कारण सांगून तिच्या घरात बोलावून तिला आतमध्ये कोंडून ठेवले. या वेळी तिच्या घरात आधीच असलेला आरोपी भगवान रामभाऊ टेंबे (58) याने फिर्यादी पीडित महिलेशी अश्लील वर्तन केले. या वेळी पीडित महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पळून गेला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं 62/2020 भा. दं. वि. कलम 354, 342, 34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोजकर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply