Breaking News

विदेशी दारू विक्री करणारा अटकेत

नवी मुंबई पोलिसांची कारवाई

उरण : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर – जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत असतांना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई ऐरोली येथे विदेशी दारू विक्रीसाठी आलेल्या इसमास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रंगेहात पकडून मुद्देमुलासह अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार नवी मुंबई ऐरोली येथील सेक्टर 9 येथे विदेश दारू विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची खबर नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने ऐरोली येथे सापळा रचून, नवी मुंबई कोरोना व्हायरस या साथीचे रोगाचा प्रादुर्भाव टाळावा, या करिता शासनाने प्रतिबंधित व पारित केलेल्या अधिसूचनाचे उल्लंघन करून आरोपी व्यक्ती नामे किरण रमेश शिवनगी (वय 25, धंदा-नोकरी, रा. घणसोली, नवी मुंबई) हा बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्रीसाठी आला असताना मिळून आल्याचे उघड झाले आहे.

त्याचेकडुन 38 हजार 350 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या 10 बाटल्यांसह 25 हजार रुपये किंमतीची होंडा स्कुटी क असा एकुण 63 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला असुन त्याचे विरूध्द रबाळे पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188, 270, 271 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51(ब) सह साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या प्रकरणी नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply