Breaking News

पनवेल रेल्वेस्थानकात सुखरूप प्रसूती

पनवेल : वार्ताहर, खारघर : प्रतिनिधी

मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी (दि. 15) घडली आहे. प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीमुळे करण्यात आलेल्या प्रसूती नंतर जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.

केरला मधील एर्नाकुलम येथून दिल्ली येथे जाणारी कोविड स्पेशल मंगला एक्स्प्रेस सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पनवेल जवळ आली असतात एक्स्प्रेस मधून प्रवास करणार्‍या डॉली सनी या 25 वर्षीय महिलेस प्रसूती वेदना जाणवत असल्याची माहिती रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या एकरुपी क्लिनिकचे डॉ. विशाल वाणी यांना देण्यात आली.

डॉ. वाणी यांनी स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने वेदनेने व्हीव्हळत असलेल्या महिलेची रवानगी स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षागृहात करत सुरक्षित रित्या महिलेची प्रसूती घडवून आणली. पनवेल रेल्वे स्थानकावर मागील 10 महिन्यात घडलेली ही दुसरी प्रसूती असून नोव्हेंबर 2019 मध्ये देखील मुंबई लोकलने प्रवास करणार्‍या एका महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची प्रक्रिया डॉ. वाणी यांनी पार पाडली होती.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply