अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले जे नागरिक आपल्या राज्यात परत जाऊ इच्छितात त्यांची माहिती जमा केली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात परराज्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. आपली माहिती देण्याकरिता तहसील कार्यालयांत हे नागरिक गर्दी करू लागले आहेत.
राज्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातही याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात बाहेर जाणार्या व्यक्तींची माहिती संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने रायगड जिल्ह्यात हजारो परराज्यातील नागरिक अडकले आहेत. काम नसल्याने या नागरिकांची आर्थिक कोंडीही झाली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद आहे. त्यामुळे हे लोक आपल्या मूळगावी जाऊ शकत नाहीत.
परराज्यात अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी केंद्र शासनाने आता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकलित झालेली माहिती प्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाने रायगड जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी हीींिीं://षेीाी.सश्रश/षसएॠछेॠढुलशी4कठी5 ही लिंक बनवून त्यात आपली माहिती ऑनलाइन भरण्यास सांगितली आहे, तर जिल्ह्यातील नागरिक बाहेरच्या राज्यात अडकले असतील तर त्यांच्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1F-IpQLSfOouvUIšw6sXNvmi7pxSoryj3e3d2b7zOkIwmL8kY9Swnnnw/viewform?usp=sfšlink
ही लिंक बनवली असून त्यात आपली माहिती भरण्याचे आवाहन केले आहे.