Breaking News

दहीहंडी खरेदीदार नसल्याने व्यावसायिक चिंतेत

उरण : वार्ताहर

कोरोनामुळे गेल्यावर्षी जन्माष्टमी साजरी झालीच नाही, ना दहीहंडी फुटल्या. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथिल केले आहेत. तरीही यंदा या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. गोविंदा दोन दिवसांवर आल्याने उरण बाजारात विविध रंगांच्या आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत, परंतु उत्सवाला निर्बंध असल्याने दहीहंड्या खरेदीदार कमी झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत.

सध्या बाजारात 440 रुपयांपासून ते अगदी 250 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या हंड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्त्याच्या कडेल राजपाल नाका, महराष्ट्र स्वीट, महराष्ट्र ज्वेलर्स बाजूंला, गांधी चौक आदी ठिकाणी व दुकानांच्या बाहेर या हंड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसत आहेत.

कृष्णजन्म झाल्यावर रात्री बारा वाजता काही ठिकाणी हंडी बांधून ती बालगोपाळांकडून फोडून घेतात. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला रंगतो. या हंड्या अगदी पाच फुटापासून 15 फुटांपर्यंत उंच बांधल्या जातात, परंतु या वेळी कोरोनामुळे पारंपारिक व घरगुती दहीहंडीला परवानगी देण्यात आली असून सार्वनजनिक दहीहंडीला शासनाने परवानगी दिलेली नाही. गणपतीपूर्वी येणार्‍या या मोठ्या सणासाठी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. गोविदांसाठी लागणार्‍या रंगीबेरंगी हंड्या, दुकानांबाहेर लटकताना दिसत आहेत, मात्र ते खरेदीसाठी कोणी येत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.

50 टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता हंडी आणि शिग घेण्यासाठी अजून गोविंदा पथकांची पावले दुकानाकडे वळलेली नाहीत. त्यामुळे यंदाही 50 टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता व्यावसायिकांना आहे, असे उरण तालुक्यातील मुलेखंड  गावातील कुंभार सुरेखा कुंभार यांनी सांगितले.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply