महापौर सहाय्यता निधीसाठी आयुक्तांकडे धनादेश सुपूर्द
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणू दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे. पनवेलमधील कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला असून, पनवेल महानगरपालिकेसह संपूर्ण तालुकासुद्धा रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. अशा परिस्थितीत कोविड योद्धे प्राणपणाने या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लढत आहेत. पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनेही यामध्ये आपला मदतीचा हात पुढे केला आहे.
पनवेल अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन डॉ. हितेन शहा यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 5) पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश महापौर सहाय्यता निधीसाठी
सुपूर्द केला. या वेळी त्यांच्यासमवेत बँकेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. पाटील, व्यवस्थापक नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper