पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले गेले. पदक जाहीर होताच सर्व पोलीस दलात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बंडगर यांना अश्याच कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 रोजी विशेष सेवा पदकदेऊन गौरविण्यात आले होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …