Breaking News

…अन् आजोबांचे नृत्य पाहून आजींनीही धरला ताल

पनवेल : प्रतिनिधी

दातार इन्स्टिट्यूटच्या ‘आनंदोत्सव-9’मध्ये  ओ मेरी जोहरा जबिन, म्हणत नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनीही ताल धरल्याचे पाहून अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागले आणि त्यांच्या तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटत होते.  

पनवेल-रसायनी रस्त्यावर असलेल्या कसालखंड येथील दातार इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी वृध्दाश्रमातील आजी-आजोबांसाठी संजय दातार यांनी आनंदोत्सव-9 आयोजित केला होता. आज घरात वृध्द माणूस म्हणजे अडचण वाटू लागले आहे. परदेशात राहणार्‍या मुलांना आपल्या आईवडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने  माहीत नसल्याच्या किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हॉट्सअ‍ॅपवर दाखवा सांगणार्‍या आजच्या तरुणांच्या बातम्या आपण वाचत असतो. वृध्द माणसे ही घरातील अडचण नाहीत. त्यांना समजून घ्या, असा संदेश देण्यासाठी 9 वर्षे संजय  दातार असा आनंदोत्सव साजरा करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, पेण, पनवेल, नेरे व  नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील वृध्दाश्रमातील 300 पेक्षा जास्त आजी-आजोबा यामध्ये सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता गेटवर मराठी पध्दतीने दिवा ओवाळून प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते.   निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य व ड्रामा  असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले  होते. ओ मेरी जोहरा जबिन, या गाण्यावर  नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचा डान्स पाहिल्यावर नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुंडलिक मद्ने यांनी एका आजींची ओढणी घेऊन डोक्याला गुंडाळून त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. ते पाहून उपस्थित तरुण-तरुणीही नृत्यात सहभागी झाल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply