पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात तब्बल 535 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी (दि. 20) झाली. त्याचबरोबर 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 267, पेण 43, अलिबाग 41, माणगाव 38, रोहा व महाड प्रत्येकी 31, खालापूर 24, कर्जत 22, उरण 16, सुधागड 10, म्हसळा सात, श्रीवर्धन तीन, तळा दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तीन, उरण व रोहा प्रत्येकी दोन, पेण, अलिबाग, सुधागड व महाड प्रत्येकी एक आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 22,887 व मृतांची संख्या 682 झाली आहे. 18,725 जण कोरोनामुक्त झाल्याने 3480 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …
RamPrahar – The Panvel Daily Paper