पेण : प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी वडखळ येथील जेएसडब्ल्यू वसाहतीमधील परप्रांतीय कामगारांनी अचानक आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी या परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याबाबत आदेश दिल्याने या कामगारांची आरोग्य तपासणी पेण नगर परिषद मैदानात करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात ओडिशा येथील परप्रांतीय कामगारांसाठी 16 बस असून टप्याटप्याने इतर राज्यातील परप्रांतीय कामगारांसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व परप्रांतीय मजुरांची तपासणी करतेवेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.