Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे निराधार परप्रांतियांना आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे विनानिवारा फसलेल्या निराधार 11 परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे.  
नवीन पनवेल परिसरात 11 निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगितली. आमदार ठाकूर यांनी ताबडतोब नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याशी संपर्क करून मदत करण्याची सूचना केली. त्यानुसार नगरसेवक संतोष शेट्टी व त्यांच्यासोबत गुरुद्वाराचे सदस्य गगनसिंग आनंद, दर्शन पोपट यांनी या 11 निराधार परप्रांतीयांची योग्य प्रकारे सोय केली.
सध्याच्या परिस्थितीत काही गरीब आणि निराधार मजुरांना गावी जाता येत नाही. मूळचे झारखंडचे असलेले हे नागरिक पनवेल परिसरात मोलमजुरीचे काम करतात. कोरोना व लॉकडाऊनमुळे हे 11 जण निवार्‍यापासून वंचित होते. त्यांना लॉकडाऊन झाल्यापासून गुरुद्वाराच्या वतीने नियमितपणे भोजन दिले जात होते, परंतु पाऊस व वादळात ते कंटेनर वाहनाखाली जीव मुठीत राहून वास्तव्य करीत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार संतोष शेट्टी, दर्शन पोपट व गगनसिंग आनंद यांनी या 11 परप्रांतीय नागरिकांची नवीन पनवेल येथील वृंदावन आश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर गुरुद्वाराद्वारे भोजन, वृंदावन आश्रमाकडून निवास व्यवस्था व अल्पोहार त्यांना पुरविण्यात येत असून मास्क, रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम-30 गोळ्या, सॅनिटायझरही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशातून
देण्यात आले आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या गावी सुरक्षित परत पाठवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
मागील महिन्यात बिहार येथील 45 निराधार रप्रांतियांनाही अशाच प्रकारे मदतीचा हात देण्यात आला होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply