Breaking News

गावठी हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त

रेवदंडा ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील कुदे खाडीलगत खाजण झाडीत गावठी हातभट्टीची दारू बनविण्याच्या अड्डा रेवदंडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास उद्ध्वस्त केला. या कारवाईत रेवदंडा पोलिसांनी 20 हजार किमतीची 1000 लिटर गूळमिश्रीत गावठी हातभट्टीची रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात गावठी दारूविक्री सुरू असल्याच्या चर्चेनुसार रायगडमध्ये पोलिसांनी गावठी दारूविरोधात प्रोव्हिबिशन रेड सुरू केली आहे. यानुसार  पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांना मिळालेल्या खबरीनुसार रेवदंडा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक म्हात्रे, पवार, जाधव यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण परिसर ढवळून काढून खाडीलगत खाजण झाडीत असलेला हातभट्टीची गावठी दारू बनविण्याचा अड्डा शोधून काढत धडक कारवाई केली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply