Breaking News

मतदार यादीमध्ये नाव गरजेचे

– आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
– कामोठे भाजपतर्फे मतदार आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर

कामोठे : रामप्रहर वृत्त
तुमच्या हातातील मतदानाच्या हक्कामुळेच तुम्हाला चांगले नेतृत्व निवडता येते त्यामुळे मतदार यादीमध्ये तुमच नाव असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी कामोठे येथे केले. भाजपच्या कामोठे मंडलतर्फे नवीन मतदार नोंदणी आणि मोफत आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
कामोठ्यामधील नवीन मतदारांसाठी मतदार नोंदणी मोहीम तसेच मोफत आभा कार्ड नोंदणीसाठी हे शिबिर आयोजीत करण्यात आले असून या शिबीरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव वगळणे, मतदार यादीतील तपशीलमध्ये दुरूस्ती आणि नाव स्थलांतराबाबत फॉर्म भरून घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन भाजपचे कामोठे शहर महामंत्री सुशील शर्मा, छाबा फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर चव्हाण, आणि भाजपचे कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच अनेकांनी याचा लाभ घेतला.
या वेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका हेमतला गोवारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते प्रदीप भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, मनोहर शिंगाडे, सागर ठाकरे, स्वप्नील पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक तसेच विश्व हिंदू परिषद, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री युवा मित्र मंडळ, अहिंसा मित्र मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply