पेणमध्ये पकडली 38 लाख 63 हजार 940 रुपयांची वीजचोरी
पेण : प्रतिनिधी
महावितरणच्या पेण मंडळाने थकीत वीजबिल वसुल करण्यावर भर दिला असून, दरमहा सहा कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मार्च महिन्यात पाच कोटी 17 लाख रुपयांची थकीत वीजबिल वसुली करण्यात आहे आहे. दरम्यान, मार्च 2021 ते मार्च 2022 या कालावधीत तब्बल 38 लाख 63 हजार 940 रुपयांची वीजचोरीही पकडली आहे. वीजच्या वाढत्या मागणी बरोबरच वीज चोरीचे प्रमाणही वाढले आहे. वीज चोरांना पकडण्यासाठीही महावितरणच्या पेण मंडळाने पथक तयार केले आहे.
वीजचोरी पकडण्याची मोहीम कायम स्वरूपी सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे वीज ग्राहकांनीदेखील आपली थकबाकी त्वरित जमा करून ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारापासून बचाव करावा.
-उमाकांत सकपाळे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण पेण