पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय यांना दोन वेळचे अन्न देखील मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस त्यांना संकटकाळात, एक हात मदतीचा पुढे करीत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण च्या माध्यमातून शिरढोण गावातील 325 कुटुंबाना गॅस सिलिंडर (75% अनुदानातून (सबसिडीतुन) रिफिलिंग) सोशल डिस्टसिंगचा पालन करून देण्यात आले. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांनी आपला गॅस मोबाइलवरून बुक केला असेल तरच मिळेल, असे ग्रामपरिस्थितिकीय विकास समितीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 व 4 शिरढोण पाडा रविवारी (दि. 10)सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मराठी शाळा शिरढोण पाडा येथे गॅस सिलिंडरचे देण्यात आले. तसेच मंगळवारी (दि. 12) मराठी शाळा शिरढोण पाडा येथे वॉर्ड क्रमांक 2 व शिरढोण खालची, भोईर आळी व वरची आळी यांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजता प्रितेश मुकादम यांच्या ऑफिस समोर आणि गुरुवारी (दि. 14) तलेआळी ग्रामस्थांसाठी सायंकाळी 6 वाजता दुर्गामाता शेड समोर सिलिंडर देण्यात येईल. अधिक माहितीसाठी शिरढोणच्या ग्रामपरिस्थितिकीय विकास समितीचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर (9870229545 ) यांच्याशी संपर्क साधावा