मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून चांभार्ली आणि पराडे येथे 30 लाख रुपये खर्च करून नवीन आरसीसी स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि.7) झाले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, आमदार महेश बालदी यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण काळबागे, ह.भ.प. तुकाराममहाराज मुंढे, भूषण पारंगे, आकाश जुईकर, नारायण तांडेल, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच समीर पाटील, माजी सरपंच बाळी कातकरी, प्रवीण जांभळे, सदस्य स्वप्नील जांभळे, मोहन मुंढे, धनाजी जांभळे, मिलिंद मुंढे, दीपक कांबळे, नरेश गोपाळे, सचित कुरंगळे, विशाल मुंढे, कुंडलिक जांभळे, भीमसेन जांभळे, गणू मुंढे, जगन्नाथ जांभळे, मधुकर जांभळे, ज्ञानेश्वर जांभळे, मारूती जांभळे, चंद्रकांत जांभळे, शंकर मुंढे, सागर सुखदरे, ग्रामविकास अधिकारी अजय फोफेरकर, दर्शन पोलेकर, नथू सवार, यशवंत सवार, देहू कातकरी, सुरेश कातकरी, कुसुम कातकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper