खोपोली : भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल खोपोलीत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, शहर सरचिटणीस, हेमंत नांदे, महिला अध्यक्षा रसिका शेट्ये, रमेश मोगरे, युवामोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल, पुनीत तन्ना यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. प्रारंभी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर पेढे वाटण्यात आले. यावेळी ‘भारतमाता की जय‘ च्या घोषणा देण्यात आल्या.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …