उरण : वार्ताहर : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 24) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा -अलिबाग यांच्या वतीने उरण तालुक्यातील स्मशानभूमी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. उरण तालुक्यातील एकूण 80 गावे, वाड्या व वस्त्यांतील एकूण 95 स्मशानभूमी सदर स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करण्यात आल्या. सदर स्वच्छता अभियानासाठी श्री बैठकीतील 3621 सदस्य उपस्थित होते. स्वच्छता अभियानांतर्गत अंदाजे 21.203 टन कचरा काढण्यात आला. स्वच्छता केलेल्या स्मशानभूमीचे अंदाजे क्षेत्रफळ 39431 चौमी इतके होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …