Breaking News

दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी

मोटरसायकलने रोहा ते साळाव रस्त्याने विदेशी दारूची वाहतूक करताना चोरढे येथील दोघांना रेवदंडा पोलिसांनी तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे अटक केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेवदंडा पोलीस ठाणे अंतर्गत तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे चोरढा येथील दोघे जण रोहा ते साळाव येथे विदेशी दारूचा अवैध साठा घेऊन येणार असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी मोटरसायकलने विदेशी दारूचा अवैध साठा घेऊन प्रवास करीत असलेले चोरढे येथील रहिवासी जयेश घाग (24) आणि नितीन घाग (32) या दोघांना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडे 7420 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. रेवदंडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन दारू आणि मोटरसायकल असा एकूण 17,420 रुपयांचा माल हस्तगत केला. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949चे कलम  65  (व), (श), (ष), 83प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनााखाली पोलीस नाईक नलावडे याबातचा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply