Breaking News

कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली.

यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन 1100 रुपये, संजय गौतम 1001 रुपये, जंथलारू नागराज 2500 रुपये, विशाल अग्रवाल 2500 रुपये, कै. उल्हास प्रधान यांच्या स्मृती प्रित्यर्थ  2001 रुपये, विजय साबळे 1000 रुपये, अनिल खोपडे 1000 रुपये, गुप्त अन्नदाता 1001 रुपये, टीना राज साबळे 2100 रुपये, डॉ. हर्षल सूर्यवंशी 1000 रुपये, नितीन पाटील (एरंडोल, जळगाव) 1000 रुपये, सुभाष पवार (उल्हासनगर) 1000 रुपये,  तसेच अब्दुल रहीम सुर्वे (दुबईस्थित) यांच्या पत्नी नर्गिस सुर्वे यांनी या अन्नछत्रात 56 किलो बटाटे व 12 किलोचा तेलाचा डबा देऊन सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान दिले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply