Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अबोली महिला रिक्षाचालक संघटनेला मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने अबोली महिला रिक्षाचालक संघटनेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोलाची मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. अबोली महिला रिक्षाचालकांवरही व्यवसायाभावी उपासमारीची वेळ आली होती.
अबोली महिला रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष तुकाराम भगत यांनी ही बाब दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली.  
 त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. सदर वस्तूंचे वाटप संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी नवीन पनवेल येथे केले. या वेळी संघटनेचे सचिव विलास मोरे, उपाध्यक्ष शालिनी गुरव, खजिनदार ललिता राऊत आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तत्परतेने केलेल्या मदतीबद्दल सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply