Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून इकोचालकांना मदतीचा हात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दररोजच्या प्रवासी वाहतुकीद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍यांवर कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे संकट आले आहे. अशा इको प्रवासी वाहतूक करणार्‍या पनवेल तालुक्यातील 1600 चालकांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहनचालकांना मदतीचा हात दिला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात 30 हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य देण्यात आले असून ठाकूर कुटुंबाकडून गरीब, गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे.
पनवेल तालुका परिसरातील अनेक प्रवासी इको या चारचाकी वाहनाने प्रवास करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे प्रवास बंद आहे. त्यामुळे इको वाहनचालकांना दररोजचे आर्थिक उत्पन्न मिळत नाही.
त्यामुळे भाजपप्रणित वंदे मातरम् रिक्षा चालक-मालक संघटनेच्या मागणीनुसार आयटीआय नाका, पोदी विभाग, देवद, आकुर्ली, विचुंबे, नेरे, गावदेवी उसर्ली, पंचमुखी, तक्का-कर्नाळा, मालधक्का, उरण नाका, टेंभोडे वळवली येथील 1600 इको वाहनचालकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply