Breaking News

नवी मुंबईत आढळले 64 रुग्ण; एकूण संख्या 974

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी (दि. 14) कोरोना विषाणूची लागण झालेले 64 रुग्ण आढळल्याने बधितांची एकूण संख्या 974 झाली आहे.

गेले आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमवार आला होता, मात्र गुरुवारी पुन्हा त्यात वाढ झालेली दिसून आली. आजतागायत 7653 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 5623 जण निगेटिव्ह आढळले आहेत. तर अद्यापही 1056 अहवाल प्रलंबित आहेत. बुधवारी  पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह अहवाल येऊन 53 व्यक्ती बर्‍या झाल्या असून एकूण संख्या 255 झाली आहे. विभागवार अकडेवारी लक्षात घेतल्यास  बेलापूर 5, नेरुळ 13, वाशी 5, तुर्भे 5, कोपरखैरणे 12, घणसोली 5, ऐरोली 12 व दिघा 7 असा विभागवार रुग्णांचा

समावेश आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply