Breaking News

उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सभा उत्साहात

उरण : वार्ताहर

उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने कामगार-कर्मचार्‍यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्यात आला. या सभेला उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार प्रशांत पाटील, तसेच इतर कार्यकारणी सदस्य आणि कामगार-कर्मचारी यांचे पाल्य उपस्थित होते. नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करताना कामगार-कर्मचार्‍यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने म्हणजेच व्यसनावर न करता आपल्या मुलांच्या शिक्षणावर अधिक करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply