Breaking News

चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

माणगाव : प्रतिनिधी
कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात गेलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरात न थांबता चाकरमानी हे कुटुंबासह आपापल्या गावी परतत आहेत. शहरी भागांतून येणार्‍या कुटुंबांना साथीच्या या रोगापासून सुरक्षित करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात ग्रामस्थ येऊ नयेत यासाठी ग्रामीण भागात खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विलगिकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे.
शहरी भागातून येणार्‍या कुटुंबांसाठी गावकरी मोकळे घर तयार करीत असून त्या घरांची स्वच्छता करणे, बाबूंचे कुंपण लावणे व घरगुती वापरासाठी आवश्यक सामान पुरविणे आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तताही करीत आहेत. याकरिता गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्राम कमिटी, तंटामुक्त समिती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील व ग्रामपंचायत स्तरावरील सदस्य  पुढाकार घेत आहेत. महामारीच्या या काळात एकमेकांना समजून घेऊन मदत करण्यासाठी ग्रामीण भाग पुढे असल्याचे यानिमित्ताने दिसून येते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply