पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 16) 20 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 17 जणांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली आहे. महापालिका क्षेत्रात 12 रुग्ण आढळले. यात कामोठे येथील सात, खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी दोन आणि तळोजातील एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 246 रुग्ण झाले असून, 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आठ नवीन रुग्ण आढळले असून, 13 जणांनी कोरोनाला हरविले आहे. कोन येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल तालुक्यात 344 रुग्ण झाले आहेत, तर रायगड जिल्ह्यातील एकूण आकडा 481 झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे सात रुग्ण आढळले आहेत. त्यात हॉस्पिटलमध्ये टायफॉईडवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा आणि नेरूळमध्ये डायग्नोसिससाठी जाणार्या महिलेचा समावेश आहे. एक आर्थर रोड जेलमधील पोलीस आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यातील कर्माचारी आहे. मुंबई महापालिकेतील सफाई कामगाराच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दादर बस डेपोतील चालक आणि जेएनपीटी उरणमधील एका कर्मचार्याचाही समावेश आहे.
तळोजा आरएएफमधील कर्मचारी अपेन्डिक्सच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जात होता. त्याला त्या ठिकाणी संसर्ग झाला. (पान 2 वर..) खारघरमध्ये राहणारा व आर्थर रोड जेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला. सेक्टर 15 मधील चेंबूर येथे जिओ कंपनीत अभियंता असलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून, त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. कळंबोली येथील सेक्टर 2 ईमध्ये वास्तव्य करणार्या व बेस्टच्या शिवाजी नगर गोवंडी डेपोत मॅकेनिक असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. सेक्टर 3 ईमधील रसायनिक रोड येथील आष्टे लॉजिक कंपनीत काम करणार्या 37 वर्षीय व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारपर्यंत 1800 कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी 246 पॉझिटिव्ह असून, 80 टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आजपर्यंत 127 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, 127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शनिवारी आठ नवीन रुग्ण आढळले असून, 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कोन येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. पाली देवद (सुकापूर) येथील पनवेल येथे पोइल्स असलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. देवद येथील मुंबईला खासगी मेडिकलमध्ये काम करणार्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. उलवे सेक्टर 20मधील एका व्यक्तीच्या घरातील सदस्यामुळे संसर्ग झाला आहे. करंजाडे येथील खाजगी फायनान्स कंपनीतील व्यक्तीलाही लागण झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आजपर्यंत 254 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 13 जणांचे रिपोर्ट बाकी आहेत. एकूण 98 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 27 जणांनी कोरोनावर मात केली असून, 68 जणांवर उपचार सुरू आहेत, तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल मनपा क्षेत्रात रुग्ण
कामोठे 99, खारघर 57, कळंबोली 27, नवीन पनवेल 31, पनवेल 18, सीआयएसएफ 10, तळोजा 4, एकूण 246.
Check Also
Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?
Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …
RamPrahar – The Panvel Daily Paper