Breaking News

खोपोली शीळफाटा येथे विचित्र अपघात; एक जण ठार, चौघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर शीळफाटा येथे शनिवारी (दि. 16) दुपारी तेल टँकरच्या झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर चार जण जखमी झाले. टँकरने पुढे जाणार्‍या ट्रकला ठोकर मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा असलेला अन्य एक ट्रक, पिकअप, कार व दोन दुचाकींचे नुकसान करून हा टँकर उलटला.
करसनजीत ठाकूर (वय 55, रा. ओडिशा) असे मृत चालकाचे नाव असून, रितेश ठाकूर (21), महम्मद खान, (24) बहादूर राम (53) गोरखनाथ पवार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply