Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जागोजागी नाकाबंदी

अहमदनगर ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे चेकनाका सुरू करण्यात आला आहे. येथील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. महारटाकळी येथील शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीसाठी राहुटी लावण्यात आली आहे. याकामी तेथील स्थानिकांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच येथील परिसराचा त्यांनी आढावा घेतला. महारटाकळी येथे नगर व बीड जिल्ह्याची सरहद्द असल्याने यामार्गे अवैध दारू, अवैध पैसे इत्यादी जाण्याची दाट शक्यता असल्याने ही नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची रात्रंदिवस तपासणी चालू करण्यात आली आहे. नाकाबंदी लोकसभा निवडणूक संपेपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच वायरलेस संदेश यंत्रणाही बसवण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply