Breaking News

काँग्रेसशी संबंध नाही -मायावती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे.

मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये, तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये.

उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, असे स्पष्ट करून मायावती यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्व 80 जागांवर निवडणूक लढवावी. मायावतींनी केलेल्या या ट्विटमुळे काँग्रेसची उरलीसुरली आशाही धुळीस

मिळाली आहे.

………………………………………………………………………………….. 

राज्यात मुस्लीम लीग 22 जागा लढवणार

अकोला : लोकसभा निवडणुकीत राज्यातील 22 जागा मुस्लीम लीग पक्ष लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली. केरळमध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग सोबत असले तरी लोकसभा निवडणुकीत आम्हाला सोबत घेण्यास ते इच्छुक नाहीत. काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप अफसर अली यांनी केला. ओवेसींमुळे मोठे नुकसान झाल्याने वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मुस्लीम लीग लोकसभा-विधानसभा निवडणूक लढणार आहे. लोकसभेच्या 22 जागा लढणार असून, लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असेही अली यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply