Breaking News

नवी मुंबई महापालिकेकडून रुग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार उपलब्ध रूग्णवाहिकांचे विभाग निहाय सुयोग्य नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या 12 रूग्णवाहिका असून पाच रूग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरटीओच्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एनएमएमटीच्या चार बसेसचे रूग्णवाहिका स्वरूपात तात्पुरते रूपांतरण करण्यात आले असून आणखी चार बसेसची रूग्णवाहिका रूपांतरण प्रक्रिया सुरू आहे. या उपलब्ध रूग्णवाहिकांतून कोविड 19च्या रूग्णांना ने-आण करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करतानाच काही रूग्णवाहिका इतर आजारांच्या सर्वसाधारण रूग्णांसाठीही कार्यान्वित ठेवण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. जेणेकरून कोविड रूग्णांची गैरसोय होऊ नये. सद्यस्थितीत, वाशी येथील डेडिकेटेड कोविड रूग्णालयाकडे कोव्हीड 19 रूग्णांसाठी तीन रूग्णवाहिका कार्यान्वित आहेत. 

सर्वसाधारण रूग्णांसाठी दोन, सेक्टर 14 वाशी येथील कोविड केअर सेंटर करिता एक, नेरूळ येथील माँ साहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात तीन तर सर्वसाधारण रूग्णांकरिता दोन रूग्णवाहिका, राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली अंतर्गत दोन, इतर आजारांच्या रूग्णांसाठी दोन रुग्णवाहिका वापरात आणल्या जात आहेत. या व्यतिरिक्त वाशी रूग्णालयामध्ये दोन शववाहिका असून त्यामधील एक पूर्णपणे कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या पार्थिवासाठी वेगळी ठेवण्यात आलेली आहे. 

माता बाल रूग्णालय बेलापूर अंतर्गत एक सर्वसाधारण रूग्णांकरिता व एक रुग्णवाहिका कोविड19 रूग्णांकरिता उपयोगात आणली जात आहे. तसेच इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरकरिता एक व बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 3, सीबीडी. बेलापूर येथील कोविड केअर सेंटर करिता एक रूग्णवाहिका कोविड 19 रूग्णांकरिता कार्यान्वित आहे.

त्याचप्रमाणे यासोबतच खैरणे व सानपाडा नागरी आरोग्य केंद्रांमध्येही कोविड 19 रूग्णांकरिता स्वतंत्र रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त एनएमएमटीच्या चार बसेसचे रूग्णवाहिका स्वरूपात रूपांतरण करण्यात आले असून या रूग्णवाहिका स्वरूपातील बसेस पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती व क्वारंटाइन करावयाच्या व्यक्ती अशा व्यक्तींसाठी वापरल्या जात आहेत. या बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका दोन वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयाकडे तसेच एक ऐरोली व एक इंडिया बुल्स येथे कार्यान्वित आहेत.

याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून तीन रूग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे. या रूग्णवाहिकांचे नियोजन व्यवस्थित रितीने होण्याकरिता अद्ययावत जीपीएस तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येत असून त्यावरील  नियंत्रणासाठी वाहन विभाग व एनएमएमटी विभाग अशा दोन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply