उलवे, करंजाडे, देवद, सुकापूर परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे, करंजाडे, देवद, सुकापूर येथील परिसरामध्ये प्रत्येकी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण राहत असलेल्या इमारती कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून घोषित केल्या आहेत.

यामध्ये उलवे येथील सेक्टर-19, प्लॉट नं.101,  भाग्यश्री को.ऑ.हौ.सो., करंजाडे येथील सेक्टर-2, प्लॉट नं.26, जय शिवम आर्केड, बी विंग, करंजाडे येथील सेक्टर-6, प्लॉट नं.21, शिवा बिल्डिंग, देवद येथील युनायटेड होम्स को.ऑ.हौ.सो., सुकापूर  येथील न्यू कार्तिकी सोसायटी, ए विंग या इमारती कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply