उरण : वार्ताहर – ओएनजीसी प्लांट उरण द्रोणागिरी भवन यांच्या वतीने रोजंदारीवर काम करणारे असंघटित मजूर असणार्या निवासी झोपडपट्टी, अज्ञानी असंघटित कामगारांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.
कामगार, कष्ठकरी वर्ग, गरीब वर्ग या लॉक डाउनमुळे आर्थिक परिणाम झालेला आहे. जे कामगार दिवसाच्या वेतनावर उपजीविका करीत होते, त्यांचे सर्व आर्थिक मार्ग बंद झालेले आहेत. अन्नधान्य घेण्यासाठी त्यांच्याकडे पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे सर्व पाहून उरण ओएनजीसी कंपनी या सर्व असंघटित कामगारणाच्या मदतीसाठी पुढे आलेली आहे. त्यांच्याच एक भाग म्हणजे या असंघटित असणार्या मजूर कामगारांना ओएनजीसीकडे असणार्या फंडातून जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्याची मदत करण्यात आलेली आहे. हे सर्व कामगार चाणजे विभाग चारफाटा झोपडपट्टी, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, व बादमवाडी मोरा झोपडपट्टीतील एकूण 300 असंघटित कामगारांना ओएनजीसीतर्फे जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम प्लान्ट हेड, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नरेंद्र असेजा, यांच्या मार्गदर्शनाखाली (एच.आर.ए.) जनरल मॅनेजर जॉर्ज करकट्टा यांच्या सल्ल्यानुसार ओएनजीसी एससीएसटी असोसिएशचे चेअरमन ए. बी. कांबळे, तसेच गौतम कदम, (एच.आर.ए.)इकबाल शेख व उरणचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार नरेश पेडवी यांच्या हस्ते गोर गरिबांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा वाटप करण्यात आले आहे. त्यावेळी अध्यक्ष संजय जनार्दन गायकवाड आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper