Breaking News

डॉ. बावस्करांचा पुरस्कार हा कोकणचा सन्मान

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे गौरवोद्गार

महाड ः प्रतिनिधी

विंचू दंशावर संशोधन करून समाजाला मोठ्या संकटातून वाचविणार्‍या डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा कोकणाचा सन्मान आहे. तसेच हा पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि शिफारस केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

खांदेशचे सुपुत्र डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी कोकणात येऊन विंचू दंशाने मरणार्‍या गोरगरिबांसाठी संशोधन करुन मोठे कार्य केले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करुन त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. शुक्रवारी (दि. 18) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, उपजिल्हाध्यक्ष अक्षय ताडफळे, महिला उपजिल्हाध्यक्षा डॉ. मंजुशा कुद्रीमोती, बेटी बचाव बेटी पठाव सेलच्या अध्यक्षा निलीमा भोसले, सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, संदिप ठोंबरे, तुषार महाजन, श्रध्दा भोसले, नमिता दोशी, मनोज धामनसे आदी उपस्थित होते.

दरम्यान बोलताना दरेकर यांनी महाड उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करणारीत थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तातडीने संपर्क केला. या वेळी सर्व प्रकारची साधने महाड ग्रामीण रुग्णालयाला पुरवणार आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालय करण्याचे आश्वासन त्यांनी दरेकरांना दिले. महाडकरांनी पाठपुरावा करावा, असे दरेकर म्हणाले. तसेच अधिवेशनात ग्रामीण भागातील शासकीय डॉक्टरांना पगारवाढ देण्याबाबत मागणी करणार असल्याचे दरेकर या वेळी म्हणाले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply