कळंबोली ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना हाताला काम नसल्याने अनेक गोरगरीब, निराधार नागरिकांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा संस्थांना मदत करण्यासाठी आता राजकीय व सामाजिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. खांदा कॉलनीत अशाच एका मुलींच्या मंगळाश्रम या सामाजिक आश्रमात पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या संकटात देशासह राज्यात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या आदिवासी, झोपडपट्टीवासीय, निराधार महिला व गोरगरिबांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून मदतीचा हात पुढे करून त्यांच्यासाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. पनवेलमध्ये बेघर, गरीब, मजूर, निराधारांसाठी मोदी भोजनालय सुरू करून येथे प्रत्येकाची अन्नाची भूक भागविताना दानशूर नेते रामशेठ ठाकूर यांनी विविध माध्यमांतून सेवा सुरू
केली आहे.
मात्र सामाजिक संस्थांसाठी कोणतीही मदत आली नसल्याने अनेक सामाजिक संस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यातील विद्यार्थी आणि गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात येताच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अशा संस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. खांदा कॉलनी सेक्टर 7मधील मुलींचे मंगळाश्रम आर्थिक अडचणीत सापडले आहे. परिणामी तेथील मुलींवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढे येत आपल्या वाढदिवसानिमित्त या आश्रमासाठी जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी पालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी सरपंच शशिकांत शेळके व खांदा कॉलनी विभागीय अध्यक्ष शांताराम महाडिक उपस्थित होते.