![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-conspiracy-the-1024x576.jpg)
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 19) कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी पनवेल महापालिका क्षेत्रात कलंबोली, कामोठे, काळुंद्रे येथे प्रत्येकी 5, खारघर 2 आणि पनवेल तक्का येथे एक रुग्ण नवीन सापडला असून, 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यात 405 कोरोनाचे रुग्ण झाले असून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी काळुंद्रे येथे 5 सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. कळंबोलीत नवीन 5 रुग्ण आढळले असून त्यामध्ये तुर्भे येथील पूर्वी लागण झालेल्या वाहतूक पोलिसाच्या घरातील दोघांचा समावेश आहे. एक ट्रकचालक असून एक महिला सांताक्रूझ येथून आली होती. तिला तिथेच संसर्ग झाला असावा असा निष्कर्ष आहे. कामोठे येथील एका बसवाहकाच्या घरातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. येथील मुंबईला कामाला असणार्या नर्स आणि पोलिसाचा समावेश आहे. खारघर येथील एका पोलिसासह ठाण्याच्या भविष्य निर्वाह कार्यालयातील कर्मचार्याचा समावेश आहे. पनवेल तक्का येथील कल्पतरू रिव्हर साईड कावेरी बिल्डिंगमधील एक महिला पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये जात होती. तिला त्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. काळुंद्रे पनवेल येथील 5 सफाई कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 1987 टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 101 जणांचे अहवाल बाकी आहेत.