Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन वगळून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी देण्याचे आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घसा कोरडा पडलेल्या अनेक मद्यप्रेमींना  आनंद झाला आहे.  राज्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतरही पनवेल महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिक जवळच असलेल्या कर्जत, पेण तालुक्यात जाऊन मद्य खरेदी करीत होते. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी रेड झोनमधून मद्यखरेदीसाठी येणार्‍या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग  होईल म्हणून त्यांना विरोध केला होता. त्यामुळे मद्याची दुप्पट दराने चोरटी विक्री सुरू होती, तर काही जणांनी परवडत नाही म्हणून गावठी भट्टी लावण्यास सुरुवात केली होती. त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

पनवेल महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन वगळून  सायंकाळी 5 वाजेपर्यंत काऊंटर विक्री न करता ऑनलाइन सीलबंद मद्यविक्रीला परवानगी दिल्याचा आदेश काढला आहे. यासाठी विक्रेत्याकडे मद्यविक्रीचा परवाना आवश्यक आहे. घरपोच पुरवठा करण्यासाठी मनुष्यबळ ठेवावे. डिलिव्हरी बॉयला मास्क, ग्लोव्हज सक्तीचे आहे. कामगारांना फोटोसह ओळखपत्र आवश्यक असेल. त्यांची थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक असेल. परवानाधारकाला आपली मागणी व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल किंवा लघु संदेशाद्वारे नोंदवावी लागणार आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply