Breaking News

बोकडवीरा येथे कोरोना तपासणी सेंटर सुरू

उरण : प्रतिनिधी

कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढू लागला असल्याच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील कोरोना बधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नियमित वाढ असल्याने येथील प्रशासनाने उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील बोकडवीरा येथील केअर पॉइंट हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी सेंटर सुरू करण्यात

आले आहे.

उरण तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला कोविड -19 ची लक्षणे जाणवत असतील तर कोणत्याही प्रकारे भयभीत न होता, तसेच कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसची माहिती लपवून न ठेवता तत्काळ उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकार्‍यांचे शिफारसपत्र घ्यावे व सकाळी 8 ते 11 या वेळेत बोकडवीरा येथील केअर पॉइंट हॉस्पिटलमध्ये हजर राहावे. या केअर पॉइंट हॉस्पिटल येथे रुग्णाच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविले जातील. त्यांचे तपासणी रिपोर्ट पुढील दोन दिवसांनी मिळणार असून, या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांसाठी कोरोना तपासणी सेंटर सुरू करण्यात आले असून, कोविड-19ची लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणीसाठी केअर पॉइंट हॉस्पिटल येथे सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply