Breaking News

पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पेणमध्ये शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी
पेण नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 11) राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार रविशेठ पाटील, खासदार सुनील तटकरे व श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री महेश बालदी, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी कवंडाळतळे सुशोभीकरण व मजबुतीकरण, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसविणे, शिक्षक सोसायटी व विठ्ठल आळी गटार कामाचे भूमिपूजन, मुस्लिम दफनभूमी सुशोभीकरण, नगर परिषद वाचनालय सुशोभीकरण, जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मार्गदर्शन केंद्र, कुंभार तलाव विकसित करणे, भोगावती नदी किनारा सुशोभीकरण, विश्वेश्वर स्मशानभूमीचे नव्याने बांधकाम, शंकरनगर ते स्मशानभूमीदरम्यान नाल्याचे बांधकाम, कासार तलावाचे सुशोभीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply