Breaking News

पोलादपूर नगरपंचायत निवडणूक : पोलीस यंत्रणा सज्ज; सायबर क्राईमचीही नजर

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या दिवशी कोणताही राडा होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याखेरीज, सोशल मिडीयावरून गैरसमज पसरविणारे मेसेज पसरविणार्‍यांवर सायबर क्राईम सेलचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती गुप्तवार्ता विभागाकडून देण्यात आली.पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील एक हजार 731 पुरूष आणि एक हजार 960 महिला असे एकूण तीन हजार 691 मतदार आज मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावणार आहेत. येथे 39 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. या उमेदवारांमध्ये 22 महिला तर 17 पुरूषांचा समावेश असून पहिल्या टप्प्यात 17 पैकी केवळ 13 नगरसेवकांची निवड मतदारांना करायची आहे. निवडणूक यंत्रणेने पोलादपूर शहरातील सहा शाळांमधील 13 प्रभागनिहाय मतदान केंद्रांसाठी 13 इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीन आणि 13 स्टॅण्डबाय इव्हीएम तैनात ठेवल्या आहेत. शहरातलि रयतच्या माध्यमिक विद्यामंदिर, यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल, शंकरराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूल, राजिप मराठी शाळा नं.1 आणि श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ प्राथमिक शाळा आदी सहा शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) होणार्‍या मतदानावेळी शहरामध्ये चार पोलीस अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी,16 होमगार्ड आणि एक अधिकार्‍यासह 32 राज्य राखीव पोलीसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. याखेरीज, सोशल मीडियावरदेखील विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply