Breaking News

पाकिस्तानमध्ये विमान अपघात; अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी (दि. 22) दुपारी कराची विमानतळाजवळ कोसळून भीषण अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराचीला येत होते. कराची विमानतळावर उतरण्यापूर्वी ते मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन या निवासी भागात कोसळले. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. यात 99 प्रवासी आणि क्रूमधील आठ सदस्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यूू झाला असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply