नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर मात करून दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी)मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरूवर मात केली. या विजयासह दिल्लीची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. 2012 साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. बाराव्या हंगामात दिल्लीच्या व्यवस्थापनात झालेले बदल, खेळाडूंची निवड आणि प्रशिक्षकांची साथ या जोरावर दिल्लीने यंदा ही किमया साधली आहे.
दुसरीकडे बंगळुरूच्या खराब कामगिरीचा सिलसिला या हंगामातही सुरू आहे. तळाशी असलेल्या बंगळुरूने रविवारच्या सामन्यात आपल्या शंभराव्या पराभवाची नोंद केली. ट्वेटी-20 क्रिकेटमध्ये 100 पराभव होणारा बंगळुरू तिसरा संघ ठरला आहे.