Breaking News

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यामार्फत होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.4 खारघरच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यामार्फत कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप प्रभागातील सोसायटीमध्ये करण्यात आले.

यामध्ये सर्व सामान्य नागरिक विशेषतः भाजी विक्रेते, सफाई कामगार, सोसायटीतील सुरक्षा रक्षक यांसह ऐरोलीतील एमबीए (म्युच्युअली बेनिफिशिअल अ‍ॅक्टीव्हीटीज) फाऊंडेशन या अपंग पुनवर्सन केंद्रातील गोड्स GODS’ (Group of Disable)ABODE नामक वसतिगृहात राहणार्‍या दिव्यांगाना देखील या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

प्रतिकुल परिस्थिती नगरसेविका नेत्रा किरण पाटील ह्या आपल्या प्रभागातील नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून ‘सुरक्षित प्रभाग सुरक्षित परिवार’ असा बोध देत प्रभागातील सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव यांना सदर गोळ्यांचे मोफत वितरण करत आहेत. हे वितरण हे 19 मे पासून सुरू असून आतापर्यंत जवळपास 40 ते 45 सोसायटींनी याचा लाभ घेतला असून प्रभागातील 2000 कुटुंबापर्यंत ह्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण सुरक्षित अंतर ठेवत करण्यात येत आहे. त्याचबरोबर कुणाला काही अडचण असल्यास डॉ. मयुरेश इंगळे (होमिओपॅथिक तज्ञ) यांचा मोफत सल्ला देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.  गोळ्यांचे वाटप हे खारघर मंडळ भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या नियोजनासाठी दररोज किरण पाटील, संदीप एकबोटे, वैभव हरी, दिनेश यादव, भरत कोंढाळकर, कुशल इंगळे, कपिल जावळे, महेश सव्वाखंडे यांसह इतर कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply