पनवेल : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा क्षेत्रांत कार्यरत असणारे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी शुक्रवारी (दि. 5) शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले.
सर्वांत आधी सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.
लोकाभिमुख नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा शुक्रवारी 48वा वाढदिवस होता. युवकांपासून वृद्धांपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांची क्रेझ कायम पहायला मिळते. ही अफाट लोकप्रियता त्यांनी आपल्या विधायक कार्यातून प्राप्त केली आहे. सलग तीनवेळा आमदार होऊनसुद्धा त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव दिसला नाही. त्यामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येने हितचिंतक आहेत. वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी, हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले.
निरनिराळ्या क्षेत्रांत आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा त्यांनी अंगिकारला आहे. सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन ते दिवसातून 18-18 तास काम करीत असतात. हा आदर्श समाजाला प्रेरणादायी ठरला आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सेवाव्रती आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, युवा मोर्चा दक्षिण रायगड अध्यक्ष अमित घाग, पनवेलचे माजी प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र दौंडकर, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे महेश भटे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभीष्टचिंतन
अभ्यासू व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावरूनही अभीष्टचिंतन केले. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, नितेश राणे, श्वेता महाले-पाटील, पराग शहा, अमित साटम, निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …