
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता भासत आहे. ही गंभीर परस्थिती लक्षात घेता, गुळसुंदे जिल्हा परिषद भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोशन पाटील व सावळे गावचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण केदारी यांनी सावळे गावामध्ये रक्तदान शिबिर घेण्यास सरपंचाना सुचविले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सावळे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच शिवाजी माळी, उपसरपंच अमृता म्हस्कर, सरपंच डॉ. अविनाश गाताडे, सरपंच कृष्णा केदारी, उपसरपंच दत्ता म्हस्कर, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनील माळी, गुळसुंदे विभागीय चिटणीस दिलीप माळी, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र केदारी, युवा कार्यकर्ते प्रफुल माळी, क्रांतिश्याम गाताडे, महेंद्र माळी, प्रथमेश म्हस्कर, महेश कुरंगळे, गणेश गाताडे, योगेश पाटील, कैलास केदारी, शमिल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय कुरंगळे, सीताराम माळी, नाना म्हस्कर, अरुण माळी, सचिन केदारी, संतोष माळी, दीपक कुरंगळे, वसंत माळी, परशुराम केदारी, भाऊ गाताडे आदींनी रक्तदान केले. या उपक्रमाला प्रतिसाद लाभला.