Breaking News

रायगडात 408 रुग्ण कोरोनामुक्त

अलिबाग : जिमाका

रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे रविवारी (दि. 24) जिल्ह्यात दिवसभरात 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर बाधितांच्या संख्येत 50 ने वाढ झाली आहे व जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 316 झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. पूर्वी जिल्ह्यात मोजकेच रुग्ण होते. हळुहळू संख्या वाढत आहे. या सर्व रुग्णांवर प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. यातील अनेक रुग्ण उपचारास सकारात्मक प्रतिसाद देत असून यशस्वीपणे उपचार घेवून सुखरुप घरीही जात आहेत.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने 1 मार्च ते 24 मे दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधित नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (1 मार्च 2020 ते 24 मे 2020)-1 हजार 643, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-25 हजार 552, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-11 हजार 390 रविवारी घरामध्ये अलगीकरण आत असलेले नागरिक-13 हजार 096, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये असलेले नागरिक-309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती पॉझिटीव्ह रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या-757.    

सद्य:स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या (अ‍ॅक्टीव्ह केसेस) नागरिकांची संख्या- एकूण 316  (पनवेल मनपा-147, पनवेल ग्रामीण-59, उरण-51, खालापूर-1, कर्जत-4, पेण-4, अलिबाग-6, मुरुड-3, माणगाव-29, तळा-1, रोहा-5, श्रीवर्धन-1, महाड-1, पोलादपूर-4).कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बर्‍या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 408 (पनवेल मनपा-208, पनवेल ग्रामीण 87, उरण-96, खालापूर-2, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5 महाड -1, पोलादपूर-1).

मयत नागरिकांची संख्या-33 (पनवेल मनपा-16, पनवेल ग्रामीण-5, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-1, मुरुड-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर-1). दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-50 (पनवेल मनपा-20, पनवेल (ग्रा)-9, उरण-10, कर्जत -3, अलिबाग – 2, माणगांव-5,  पोलादपूर-1). दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 35 (पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-13, उरण-9, महाड -1). दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 0

नागरिकांच्या स्वॅब तपासणीची माहिती

जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 700, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टींग न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-36, स्वॅब तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 664, तपासणीअंती निगेटीव्ह रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-1 हजार 811, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणार्‍या नागरिकांची संख्या- 96. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 757.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply