Breaking News

उरण येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

उरण : वार्ताहर

उरण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी

(दि. 19) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रेयांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आले. या वेळी राज्यपातळी चे अधिकारी डॉ. कर्नाटक सिव्हील हॉस्पिटल आलिबागचे उषा वावर (सिस्टर), पल्स पोलिओ पर्यवेक्षक मोहन जगताप, महादेव पवार, संजय घरत आदी उपस्थित होते. उरण शहराच्या हद्दीत बूथ-दहा, ट्रांझिस्ट टीम-तीन मोबाईल टीम-एक असे एकूण 14 बूथ आहेत. मोरा जेट्टी, दत्त मंदिर मोरा, नगरपालिका शाळा न.3 मोरा, सॉलट ऑफिस भवरा, मांगीर देव, बोरी नाका, इंदिरा गांधी ग्रामीण रुगणालय उरणच्या एन. आय. हायस्कूल, सेंट मेरी स्कूल, जकात नाका, समाज मंदिर उरण, कोट नाका, मिठागर ऑफिस,कोकण ज्ञानपीठ कॉलेज आदी ठिकाणी बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply