नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एक लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणार्या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. आतापर्यंत देशात एकूण 60,490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या भारताचा रिकव्हरी रेट 41.61 टक्के एवढा आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. जगात प्रति लाख लोकांमागे 4.4 मृत्यू झाले आहेत. भारतात हेच प्रमाण 0.3 आहे. जे जगात सर्वात कमी आहे. कोरोनानंतर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळेच हे शक्य झाले, असे अग्रवाल यांनी सांगितले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …