Breaking News

कविसंमेलनांमुळे जगण्याला उभारी -कवी अरुण म्हात्रे; ‘कोमसाप’च्या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त

कविसंमेलने जगण्याला उभारी देतात असे मत सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा आयोजित ऑनलाइन कविसंमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यापुढे बोलताना अरुण म्हात्रे यांनी, कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ साहित्य संस्था नसून हृदय बांधणारी संस्था आहे. लॉकडाऊच्या काळात सगळ्या जगाने भयानक अनुभव अनुभवले आहेत. लॉकडाऊनमधून आपण लवकरच बाहेर येऊ असे त्यांनी सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, कोमसाप नवीन पनवेल शाखा दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. या कविसंमेलनात अनेक विविध विषयांवर कविता सादर करून कवी हे संमेलनात रंगत आणतील अशा शुभेच्छा दिल्या. कोमसापचे नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, संकट काळात कविता बळ देते, ताकत देते त्यामुळे जगण्याला उर्जितावस्था येते. कवींच्या उत्साह निर्माण करणार्‍या कविता आलेली संकटे विसरून जायला शिकवतात,

असे सांगितले. कविसंमेलनात प्रा. चंद्रकांत मढवी, गझलकार ज्योत्स्ना राजपूत, कवी प्रकाश पाटील, रामदास गायधने यांनी सहभाग घेतला. आक्रोश, वगैरे -वगैरे, महापुरुषांनो पुतळे फोडून बाहेर या, जगाचा पोशिंदा या कविता सादर केल्या. कविसंमेलनाला कोमसापचे जनसंपर्कप्रमुख एल. बी. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. आभार स्मिता गांधी यांनी मानले, तर उत्कृष्ट सूत्रसंचालन योगीनी वैदू यांनी केले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply