Breaking News

फीसाठी तगादा लावणार्‍या शाळांवर कारवाई करा -संजय भोपी

कळंबोली : प्रतिनिधी

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन परिस्थिती आहे. या टाळेबंधीत उद्योगधंदे बंद असून  लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आपात्कीलीन परिस्थिती शाळाने फी साठी तगादा लावत आहेत अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात टाळेबंदी असून या टाळेबंदीत बहुतेकांचा रोजगार हा बंद झाला आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांना सध्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा मोठा प्रश्न समोर आहेत. बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांना राज्य शासनाच्या आदेशानुसार पुढील वर्गात प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुढील वर्षाची शाळेची फी भरण्यासाठी  जोपर्यंत या कोरोना आपत्कालीन परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वकाही सुरळीत होत नाही तोपर्यंत शाळेची फी तगादा लावू नयेत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील शाळांमार्फत व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्याकडून पालकांना शालेय फी भरणेसाठी विविध प्रकारे दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

 या अनुषंगाने शाळांनी पालकांना शालेय फी भरणेसाठी लावण्यात आलेला तगादा थांबविण्यासाठी समज देण्यात यावी अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी महानगरपालिकेचे. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति आमदार प्रशांत ठाकूर,  रायगड  जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री यांना ई – मेल द्वारे पाठविण्यात आल्या आहेत. पालकांना होत असलेल्या त्रासातून दिलासा देण्याची विनंती करत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून अशा परिस्थितीत शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत उभी राहील, अशी अपेक्षा संजय भोपी यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply